1.बाल कामगार विरूद्ध जागतिक दिन हा आंतराष्ट्रीय दिवस म्हणून दरवर्षी 12 जूनला पूर्ण जागतिक पातळीवर साजरा करण्याचा निर्णय हा आंतराष्ट्रीय कामगार संघटनेने (international labour organization) घेतला होता.
2. शिक्षण घेण्याच्या वयात लहान मुलांनी बालमजुरी करू नये व बालकांच्या मदतीसाठी काय-काय करता येईल यासाठी 12 जून 2000 मध्ये आंतराष्ट्रीय कामगार संघटनेने या दिवसाची सुरुवात केली होती.
3. या दिवसाचा उद्देश एवढाच की बाल कामगारांच्या दुर्दशावर प्रकाश टाकणे आणि लहान मुलांनी मजुरी सोडून शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे.
4.दरवर्षी १२ जून रोजी बाल कामगारांच्या दुर्दशावर आणि त्यांच्या मदतीसाठी काय करता येईल यावर प्रकाश टाकण्यासाठी सरकार, मालक आणि कामगार संघटना, नागरी संस्था तसेच जगातील लाखो लोकांना एकत्र आणते. हे या दिवसाचे वैशिष्ट्य आहे.
5.2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार, भारतात 5 ते 14 वयोगटातील 10.13 दशलक्ष बाल कामगार होते.
6.शाळेत जायच्या वयात मुले कामे करणे,बर्याचांना योग्य पोषण आहार मिळत नाही.
7.बालकामगारांचे सर्वात वाईट प्रकार जसे की घातक वातावरणात काम करणे, गुलामगिरी किंवा इतर प्रकारची जबरी कामगार करून घेणे,अंमली पदार्थांची तस्करी करणे आणि लहान मुलींना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणे आणि तसेच लहान मुलांचा ब्रेन वॉश करून सशस्त्र,दहशतवादी संघटनाच्या संघर्षात सहभाग करून घेणे यासारख्या गोष्टी उघडकीस आल्यामुळे या सर्व गोष्टी वर प्रकाश पडण्यासाठी हा दिवस साजरा करायला सुरुवात केली.

8.. भारतात बालमजुरी संबंधी कायदा बाल कामगार सुधारणा (प्रतिबंध व नियमन) अधिनियम,2016 म्हणून ओळखला जातो.
9.हा कायदा मुलांच्या रोजगाराचे नियमन करतो आणि 14 वर्षाखालील मुलांना बाल कलाकार म्हणून काम करण्यास परवानगी देत नाही.
10.या कायद्या नुसार लहान मुलांना कामास लावणाऱ्या पालकांना किंवा मालकांनकडून 20,000/-ते 50,000/- दंड वसूल केला जाईल आणि एक वर्षाचा तुरुंगवास सुद्धा करण्यास येईल.
11.बालमजुरीविरोधात तक्रार करण्यासाठी आपण 1098 हा एक टोल फ्री नंबर वर तक्रार करू शकता.
या दिनानिमित्तने पालकांनी व आई- वडीलानी लहान मुली-मुलांची उत्तम प्रकारे काळजी घेतली पाहिजे
तर कशी काळजी घ्याल जाणून घ्या-
मुलांची खेळणी सॅनिटाईझ करा.
मास्क घालण्यास मदत करा.
मुलांनी पुरेसा वेळ हात धुवावेत यासाठी लहान मुलांना हात धुताना दोनदा ‘हॅपी बर्थडे’ गायला सांगा .
काय करावे-
1. जर लहान मुलांमध्ये 2 ते 3 दिवसापेक्षा जास्त दिवस ताप येत असेल, कमीच होत नसेल जेवढ्या लवकरात लवकर तज्ज्ञ डॉक्टरांची अवश्य मदत किंवा सल्ला घ्यावा.
2.लहान मुलांना खूप आराम करू द्यावा.
3.जास्तीत जास्त लिक्विड पदार्थ खाऊ घालावेत.
4. कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्या वरही लहान मुलांचे उपचार सुरू ठेवावेत.
5.पालकांनी लहान मुलांना मास्क घालणे आणि sanitiser वापरणे यास मदत करावी.
6. Social distancing पाळावे.
7.सतत लहान मुलांचे हाथ sanitiser धुणे.
काय करू नये-
1.लहान बाळांना जास्त गर्दी मध्ये घेऊन जाऊ नये.
2.लहान मुलांची काळजी घ्यावी.
3.लहान मुलांना तोंडाला नाकाला हाथ लावू देऊ नये.
4. बाळाला स्वेटर, चादर, रगमध्ये गुंडाळू नये.
5.नळाखाली थंड पाण्याचे आंघोळ घालू नये
6.पावसाच्या वातावरणात किंवा वाऱ्यामध्ये मुलाला बाहेर फिरू देऊ नये.
लहान मुलांनसाठी पौष्टीक आहार बनवा आणि त्यांना भरावा. पौष्टीक अन्न म्हणजे भाजीपाला, प्रोटिन्स असलेले पदार्थ आणि व्हिटॅमिन c या सारखा पौष्टिक आहार लहान मुलांमध्ये शक्तीशाली प्रतिकारशक्ती वाढवायला मदत करते.

सतत खोकला आणि सर्दी येणे.कदाचित लहान मुलांमध्ये सर्दीची लक्षणे हलकी किंवा कळून येत नाहीत.
थकवा आणि चक्कर येणे ,हे लक्षणे लहान मुलांना खूप पिडा वेदना देतात.
पोटदुखी हे लक्षण लहान मुलांमध्ये होते.
लहान मुलांना श्वास घेण्यास अडथळा येत असेल किंवा लहाल मुलं श्वास घेताना मोठ्याने उसकार टाकत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा आणि योग्य उपचार घ्या. आणि डॉक्टरांशी सल्लामसलत करा.
मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी पालकांना सल्ला-
1.लहान मुलांशी सवांद साधा.
2. लहान मुलांसोबत वेळ घालावा.
3. त्याचे विचार आपुलकी ने ऐका.
4.त्यांच्या कामाचे कौतुक करा.
5.अभ्यास करण्यासाठी जास्त लहान मुलांना सक्ती करू नका. त्यांना पेलेलं तसे त्यांच्याकडून अभ्यास करून घ्या.
6.मुलांसोबत खेळण्यात वेळ घालावा.
7.लहान मुलांनपुढे शिवीगाळ करू नका.
8.लहान मुलांच्या हातात स्मार्ट मोबाइल जास्त वेळ देऊ नका.
9.मुलांचे मन प्रसन्न करण्यासाठी संगीत लावा व नृत्ये करा.
#बालमजुरी हटवा, देश वाचवा!
#लहान मुलांच्या हातात पोत नको, लिहिण्याची पाटी हवी.
# अब की बार बालमजुरी पर वार!
#लहान मुलं असतात देशाच्या भवितव्यसाठी योग्य,
त्यांच्या हातातून काम करून घेणं आहे अयोग्य.
## बालमजुरीला घ्या नकारा, बालशिक्षण ला द्या होकारा.
## child’s education is forever.
##चुमकल्यासाठी बालमजुरी नको, शिक्षणाचा अधिकार हवा.
#Say to No Child Labour, Say Leaders
#Say to no child labour,Say to Yes for education.
##Children are the future of our Nation. End child labour.
#Kids deserve happily life living.
Akash Raychand Shinde.