World Environment day
1.जागतिक पर्यावरण दिन हा दरवर्षी 5 जून रोजी पूर्ण जागतिक पातळीवर साजरा करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्राने घेतला.
2.हा निर्णय 5 जून 1974 साली घेण्यात आला.
3.जागतिक पर्यावरण दिन हा जगातील जागरूकता आणि आपल्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी कृतीस प्रोत्साहित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचा दिवस आहे.
4.पर्यावरणाचा ऱ्हास थांबण्यासाठी व पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
5.जागतिक पर्यावरण दिन हा सार्वजनिक व्याप्तीसाठी एक जागतिक व्यासपीठ आहे.
6.पर्यावरण म्हणजे आपल्या भोवतीचा परिसर असे सामान्यपणे म्हणता येईल. यामध्ये आपल्या भोवताली असणारे सगळेच घटक येत असतात. आपल्या भोवतीचे वृक्ष, पक्षी प्राणी, माणूस, जमीन, पाणी, हवा, जंगल, डोंगर, या सर्वाचे एकत्रित असणे म्हणजे परिसर असतो. पर्यावरणात या सगळयाच घटकांचा एकत्रितपणे विचार करण्याची आवश्यकता असते. कारण हे सगळे घटक एकमेकांवर अवलंबून असतात.
7.जागतिक स्तरावर दरवर्षी 143 पेक्षा जास्त देशांचा सहभाग आहे.
8.जागतिक पातळीवरपर्यावरणविषयक समस्या जागरूकता करणे हा मुख्य उद्देश आहे.
9.पुथ्वीचे रक्षण आणि पर्यावरणची काळजी घेण्यासाठी याला people day असें हीं म्हणतात.
10.पर्यावरणाच्या प्रश्नांबाबत सामान्य लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.
11.सुरक्षित, स्वच्छ आणि अधिक समृद्ध भविष्याचा आनंद घेण्यासाठी लोकांना आसपासचा परिसर सुरक्षित आणि स्वच्छ करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा ही मुख्य उद्देश आहे.
12.दरवर्षी जगातील वेगवेगळे देश हा दिवसाचा कार्यक्रम नियोजन एकत्र येऊन करतात, यावर्षी पाकिस्तान हा देश कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि नियोजन करणार आहे.
13.माझ्यातर्फे सर्व प्रिय माझ्या बांधवांना जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
घरी राहून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करूया, कोरोनाला हरवूया.
घरी राहा, सुरक्षित राहा.
#कोरोनाला नाकारा ,पर्यावरनाला होकारा.
#जीवन वाचण्यासाठी पृथ्वी वाचवा, पृथ्वी वाचवण्यासाठी पर्यावरण वाचवा.
#पर्यावरण वाचवा, जीव वाचवा.
#If Environment can’t breath then you can’t breath.
#जर पर्यावरणाचा ऱ्हास नाहीसा होईल ,तर आपला देश महान होईल.
#जर कराल पर्यावरणाची रक्षा, तर आपली राहील मजबूत सुरक्षा.
#झाडांचे रोपण, पर्यावरणाचे संवर्धन.
Remember Do mask on!
Before you move on!
आकाश रायचंद शिंदे(सहायक दिग्दर्शक, लेखक &एडिटर)