आक्रमकतेणे बळी पडलेल्या निर्दोष मुलांचा आंतराष्ट्रीय दिवस
मोजकेच ठळक बुलेट पॉईंट:-
- आक्रमकतेणे बळी पडलेल्या निर्दोष मुलांचा आंतराष्ट्रीय दिवस हा दरवर्षी 4 जून रोजी साजरा करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्राने घेतला.
- हा निर्णय 19 ऑगस्ट 1982 साली घेण्यात आला.
- 1 ऑगस्ट 1982 रोजी पॅलेस्टाईनच्या प्रश्नावरील आणीबाणीच्या सत्रात , यूएन जनरल असेंब्लीने, इस्रायलच्या आक्रमक कृत्यात बळी पडलेल्या निष्पाप पॅलेस्टाईन आणि लेबनीज मुलांचे प्रमाण लक्षात घेतल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक वर्षाचा 4 June जून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
- ह्या हल्ल्यात पॅलेस्टिनी आणि लेबनीज या बळी पडणाऱ्या मुलांचा समावेश होतो.त्यामुळें लहान मुलांवरील हल्ले थांबवावे यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
- ह्या दिवसाचा मुख्य उद्देश असा आहे की शारीरिक, मानसिक आणि भावनिक अत्याचाराला बळी पडणाऱ्या मुलांचे जगभरात होत असलेल्या वेदना मान्य करणे हा आहे.
- हा दिवस मुलांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी संयुक्त राष्ट्रांच्या बांधिलकीची पुष्टी करतो.
- हिंसक अतिरेकी संघटना मुलाला लक्ष्य करतात व त्यांचा brainwash करून त्याकडून हिंसाचारी कामे करून घेतात.या सर्व प्रकारा पासून लहान मुलांचा बचाव करण्यासाठी संयुक्त राष्ट्र प्रयत्न करत आहे.
- आंतरराष्ट्रीय मानवतावादी आणि मानवी हक्क कायद्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मुलांच्या हक्कांच्या उल्लंघनाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी अधिक कार्य केले पाहिजे.
- साधारणपणे Bloomberg news चॅनेलच्या रिपोर्ट नुसार दर वर्षी अंदाजे 200 दशलक्ष मुले लैंगिक हिंसाचाराचा बळी असतात.
- या उद्दीष्टाचा एक भाग म्हणून, संयुक्त राष्ट्र संघाने 2030 पर्यंत मुलांवरील अत्याचार, शोषण, तस्करी आणि सर्व प्रकारच्या हिंसाचाराच्या समाप्तीची अपेक्षा केली आहे.
जगातील बऱ्याच देशामध्ये लहान मुले सुरक्षित नाहीत त्यातील काही देश पाकिस्तान,इजिप्त,मोझांबिक,व्हिएतनाम,चीन,इंडोनेशिया
रशिया,अर्जेंटिना आणि नायजेरिया या सर्व देशांचा समावेश आहे.
(लेखक सध्या Foxberyy Technology PVT.LTD, Pune सकाळ बातमी वृत्तपत्र शी संलग्न असलेल्या कंपनी मध्ये इंटर्नशिप करत आहेत)
Blogger- Akash Raychand Shinde {Assistant Director, Content Writer, Editor}