जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी:-
विशेष तज्ज्ञांनी आणि वैज्ञानिकानी लहान मुलांना तिसरी लाट धोकादायक ठरू शकते हा अवहाल सादर केल्यापासून सर्व पालकांच्या मनात आपल्या मुलांच्या बद्दल प्रेमापोटी भीती वाटू लागली आहे.गेली एक वर्षं झालं कोरोनाच्या संसर्गजन्य रोगांमुळे खूप मोठ्या प्रमाणात लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अजून पण कोरोना पीडित रुग्ण मृत्यूदर कमी होण्याच नावच घेत नाही.कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. या सर्व गंभीर परिस्थिती मध्ये लहान मुलांच्या संगोपनाची काळजी घेणे खूप आवश्यक आहे.
सर्व प्रकारच्या जैविक क्रियांसाठी उर्जा निर्माण करण्या- करता आपल्या शरीराला ऑक्सिजनची गरज भासते.
चला तर माहिती करून घेऊया की oxygen लेव्हल मोठ्या व्यक्तींमध्ये आणि लहान मुलांमध्ये किती असायला हवा किंवा साधारणपणे मोजण्याची रेंज किती असते.
तिसऱ्या लाटेतील कोरोना विषाणू (coronavirus) हा दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक प्रभावशाली असून तो व्यक्तीच्या आणि लहान मुलांच्या ऑक्सिजन लेवल वर ही परिणाम करत आहे. या मध्ये व्यक्तीची ऑक्सिजन लेवल हळूहळू कमी होऊन व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होतो असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
1.जर मोठ्या व्यक्तींची oxygen लेव्हलची तपासणी करताना 94=> किंवा त्यापेक्षाही जास्त असल्यास मोठ्या व्यक्तीसाठी चांगले आहे.
2.जर oxygen लेव्हल 95-100=> या दरम्यान असल्यास उत्तम आहे असा अर्थ होतो.
3.जर oxygen लेव्हल 90 -93=> त्यापेक्षाही कमी असल्यास मोठ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये oxygen कमी आहे तसेच जर रेंज 80 -89 =>या दरम्यान झाली मोठ्या व्यक्तीच्या शरीरात oxygen खूपच कमी आहे. अश्या परिस्थिती मध्ये रुगणांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
काही लहान मुलांना श्वास घेण्यात समस्या निर्माण होते आणि खाणे, रडणे व खेळणे या प्रक्रियांमुळे श्वास घेणे अजून कठीण होऊन बसते. लहान मुलांना काही सेकंद वा मिनीटांसाठी ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्यास काही नुकसान होत नाही. परंतु लो ब्लड ऑक्सिजन लेव्हल कायम राहण्यासाठी ऑक्सिजन लेव्हल 88 टक्क्यांपेक्षा जास्त खाली गेल्यास शरीराला नुकसान पोहचू शकते.
जर लहान मुलांमध्ये 88 आणि त्याच्या पेक्षाही खाली रेंज असेल तर oxygen ची पातळी लहान मुलांमध्ये कमी असते.अशावेळी पालकांनी जबाबदारीने ताबडतोफ लहान मुलांना बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा.
जर ऑक्सिजन लेव्हल 92 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर त्याचा अर्थ आहे की शरीराला आपल्या गरजेनुसार पुरेश्या प्रमाणात ऑक्सिजन मिळत आहे. पल्मोनरी हाइपरटेंशनने ग्रस्त असणाऱ्या लहान मुलांमध्ये 95 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त ब्लड ऑक्सिजन लेव्हल असायला हवी.
आता आपण HRCT SCORE बद्दल सामान्य माहिती घेऊयात-
HRCT फुल फॉर्म High-resolution computed tomography (HRCT) असा होतो.

ते काय असतं तर पाहुयात
हाय-रेजोल्यूशन कॉम्प्यूट्युटेड टोमोग्राफी (एचआरसीटी) ही एक तपासणी पद्धत आहे जी फुफ्फुसाच्या ऊती आणि वायुमार्गाच्या आजाराचे निदान आणि देखरेखीसाठी छातीच्या 2-उंदरापेक्षा अधिक अचूक आहे. … एचआरसीटी काप संपूर्ण शरीराच्या छातीच्या कॉन्ट्रास्ट-वर्धित सीटी स्कॅनमधून देखील तयार केले जाऊ शकतात.
HRCT स्कोर ही गोष्ट मोठ्या व्यक्तीच्या आणि लहान मुलांच्या शरीरामध्ये काय काम करते ते माहिती करून घेऊया.
1.जर 0-8= >या दरम्यान रेंज असेल तर सौम्य संसर्ग मानला जातो.
2.जर 9-18= > या दरम्यान रेंज असेल तर मध्यम संसर्ग मनाला जातो.
3.आणि जर 19-25 => या दरम्यान रेंज असेल तर अति संसर्ग मनाला जातो.
लहान मुलांमध्ये आणि मोठ्या व्यक्तींमध्ये यांचे प्रमाण जवळजवळ सारखेच असतात. राज्य सरकारने आता HRCT स्कोर काढण्यासाठी 2500/- शुल्क आकारण्यास डॉक्टरांना आदेश देण्यात आले आहेत.
आता तापमान किती असायला हवे हे पाहुयात-
हल्ली लहान मुलांमधील ताप काळजी करायला लावणारा असतो. परंतु अंगाला हात लावून जाणवत जरी असला तरी प्रत्यक्षपणे थर्मामीटरवर मोजणे गरजेचे आहे.
तापमान मोजण्यासाठी अंश सेल्सिअस, अंश फॅरेनहाइट, आणि अंश केल्विन ही एकके वापरतात.
1.जर 98.6F =< या रेंज मध्ये लहान मुलांमध्ये किंवा मोठ्या व्यक्तींमध्ये तापमान असेल तर ताप नाही असे समजायचे.
2.जर 99.0 F=> या रेंज मध्ये असेल तर थोडा ताप आहे समजून जायचे.
3.आणि जर 100-102F=> या रेंज मध्ये असेल तर जास्त ताप आहे.
आता आपण Pulse PR किती हवा?Pulse PR म्हणजे काय हे समजून घेऊयात.
हल्लीच सरकारने घोषणा केली की होम क्वारंटाईन केलं जाणा-या लोकांना पल्स ऑक्सिमीटर दिले जातील. बरं झाल्यानंतर हे डिव्हाईस सरकारला परत करावं लागेल.
पल्स ऑक्सिमीटर ही एक प्रकारची चाचणी असते. पल्स ऑक्सिमीटर मध्ये आपलं बोट ठेवायचं असतं आणि त्यानंतर लगेचच त्यावर काही नंबर दाखवले जातात. या चाचणीमध्ये रुग्णाला कोणतीही दुखापत किंवा वेदना होत नाहीत. ही वस्तू आपल्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा मापण्यास मदत करते. तसेच पल्स डिव्हाईस आपल्या शरीरात झालेल्या छोट्यात छोट्या बदलाचीही माहिती देते. हे एका छोट्याश्या क्लिपसारकं डिव्हाईस असतं.

लहान मुलांमध्ये आणि मोठ्या व्यक्तीमध्ये pulse pr किती हवा-
1.जर 60-90 प्रेतेक सेकंदला असेल तर समजून जा की pulse pr चांगला आहे.
2. जर 90 => या रेंज मध्ये असेल तर पल्स pr वाढलेला आहे.असा अर्थ होतो
3.आणि पण जर 100-120=>या दरम्यान रेंज असेल तर जास्त आहे.लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधून योग्यरित्या तपासणी करावी.
आता शरीरात blood pressure च प्रमाण किती असते हे पाहूया-
रक्ताने रक्तवाहिन्यांवर आतील बाजूने निर्माण केलेल्या दबास रक्तदाब असे म्हणतात.
आपल्या रक्तवाहिन्यांमधील दाब मोजण्यासाठी मोजमापाच्या युनिटला मिलिमीटर, पारा (एमएमएचजी) म्हणतात.
1.जर 100/60 =< या रेंज मध्ये असेल तर कमी आहे.
2.जर 140/90 =< या रेंज मध्ये असेल तर नॉर्मल आहे.
3.जर 140/90=> या रेंज मध्ये असेल तर जास्त आहे.
4.जर 150/95 => या रेंज मध्ये असेल तर खूपच जास्त आहे.
लहान मुलांमध्ये आणि मोठ्या व्यक्तीमध्ये B.P चे प्रमाण समान यंत्रने मोजले जाते त्यामुळे समान रेंज असते.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून मुलांचा बचाव करण्यासाठी खलील गोष्टी लक्षात घ्या.
हे करा-
लहान मुलांचे साबण, कंगवे आणि इतर गोष्टी वेगळ्या ठेवा लहान बाळांना दूध पाजताना, अन्न भरवताना, कपडे बदलण्याआधी हात स्वच्छ धुवून घ्या.
कारचा वापर करत असल्यास कार वेळोवेळी सॅनिटाईझ करून घ्या.
मुलांची खेळणी सॅनिटाईझ करा.
मुलांनी पुरेसा वेळ हात धुवावेत यासाठी लहान मुलांना हात धुताना दोनदा ‘हॅपी बर्थडे’ गायला सांगा .

हे करू नका-
1.बाळाला स्वेटर, चादर, रगमध्ये गुंडाळू नये.
2.नळाखाली थंड पाण्याचे आंघोळ घालू नये
3.पावसाच्या वातावरणात किंवा वाऱ्यामध्ये मुलाला बाहेर फिरू देऊ नये.
Blogger-आकाश रायचंद शिंदे (Content Writer, Assistant Director )and Student of Journalism and mass communication.)
