म्युकर माइकोसिस (ब्लॅक फंगस) म्हणजे काय?
1.जेव्हा आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती खूप प्रमाणात कमी-कमी होऊ लागते.अश्यावेळी “mucor” फंगस रोग होण्याची संभावना जास्त असते.
2.तसेच खूप महत्वाचे म्हणजे म्युकर माइकोसिस संसर्ग झालेल्या व्यक्तीला दिसणं कमी येते आणि काहींना ना तर काहीच दिसत नाही परिणामी जीवनाचा आनंद घेण्याची संधी नाहीशी होते आणि खूप अडचणीला सामोरे जावे लागते.
3.म्युकर माइकोसिस हा संसर्गजन्य रोग पिडीत व्यक्तीला कोरोना वर उपचार घेत असताना सुद्धा होऊ शकतो किंवा कोरोना रोगापासून बरा झाल्यानंतरही काही आठवड्यात होण्याची शक्यता असते.
म्युकर माइकोसिस (ब्लॅक फंगस) हा संसर्गजन्य रोगचा प्रादुर्भाव वाढण्याचे कारण-
1.कोरोनामुळे मधुमेहाची स्थिती अधिकच बिघडू शकते किंवा यामुळे सामान्य लोकांमध्ये मधुमेह होऊ शकतो.
2.स्टेरॉयड आणि Tocilizumab या सारख्या कोरोनाच्या गोळ्यांमुळे प्रतिकारशक्ती खूप कमकुवत होऊ शकते. त्यामुळे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार मेडिसिन घेणें हे सोयीस्कर आहे.
3.म्युकर माइकोसिस (ब्लॅक फंगस) झालेल्या संसर्गाची तीव्रता खूप मोठ्या प्रमाणात रुग्णांची प्रतिकारशक्ती आणि
सामान्य आरोग्यावर अवलंबून असते.
या भयंकर म्युकर माइकोसिस लक्षणांना दुर्लक्षित करू नका-
- म्युकर माइकोसिस संसर्ग सामान्यत: नाकात सुरू होतो आणि डोळे आणि मेंदूपर्यंत पसरू शकतो.
नाक आणि साईनस का म्युकर संसर्ग (सुरुवातीची आजार)
1.सतत डोकेदुखी आणि सर्दी होणे हे गंभीर लक्षण आणि
तसेच वेदनावरील गोळ्यांचा काहीच फरक पडत नाही.
2.नाकातून पाणी येणे किंवा रक्त येणे.चेहऱ्यावर वेदना किंवा संवेदनशीलता कमी-कमी होते.
3.चेहऱ्यावर त्वचेचा रंग बदलणे.चेहऱ्यावर सूज येणे आणि दात हालने .
नेत्र /ओरबीटल म्युकर संसर्ग (मध्यम ऍडव्हान्स रोग)
1.डोळ्याला सूज येते, एक व्यक्ती एकाच वेळी दोन वेळा दिसणे म्हणजे double vision
दृष्टी जाणे.
सतत डोळे दुखणे.
म्युकर माइकोसिस (ब्लॅक फंगस) पासून वाचण्यासाठी सावधगिरी बाळगत काय करावे आणि काय करू नये-
काय करू नये-
1.स्वतःच्या मनाने गोळ्या घेऊ नका. आवर्जून डॉक्टर चा सल्ला घ्या.विशेष म्हणजे स्टेरॉयड गोळी घेऊ नका.
2.जर म्युकर माइकोसिस संसर्गजन्य रोगांची लक्षणें आढळल्यास उपचार घेण्यासाठी उशीर करू नका.
3.डॉक्टरच्या सल्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांच्या सल्याचे काळजीपूर्वक पालन करा.
काय करावे-
1.आपल्याला मधुमेह झाल्या असल्यास डॉक्टरांना संपर्क साधून त्यांना पूर्ण माहिती द्या.
- बीपी आणि शुगर टेस्ट वारंवार करावी.
3.घराची साफ सफाई करा. स्वच्छता ठेवा.
4.म्युकर माइकोसिस संसर्गजन्य रोगांच्या लक्षणांवर ध्यान ठेवा.
जर समाजा अचानकपणे तुम्हाला लक्षणें जाणवू लागली
तर पटकन खालील गोष्टी करा-
ताबडतोब डॉक्टर ला संपर्क साधून सल्या घ्या.
डॉक्टर आपल्याला तपासेल आणि आवश्यक झाले तर स्वब घेऊन नाकातून फंगसची तपासना करतील.
जर समजा संसर्ग जास्त प्रमाणात आढळत असेल तर डॉक्टर antifungal गोळ्या किंवा सर्जरीची आवश्यकता असू शकते.
-आकाश रायचंद शिंदे