शीर्षक वाचून जरा चक्रावला असाल ना…पण लवकरच शीर्षकाचा उलगडा होईल. ही बातमी आहे माण-खटाव मध्ये होत असलेल्या नव्या चित्रपटाविषयीची.
करोना अनलॉकनंतर हळूहळू सगळ्या गोष्टी स्थिरावताना दिसत असताना कोरोनाच्या नियमांचे पालन करत अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नोंदणीकृत असलेल्या मयुरी रणदिवे फिल्म प्रोड्युकॅशन निर्मित * झटका* एक आस या नवीन येत असलेल्या मराठी चित्रपट चित्रीकरकणाचा शुभारंभ दि.१७ मार्च रोजी औंध ता.खटाव या ठिकाणी संपन्न झाला.
सदर चित्रपटातून ग्रामीण प्रेमकथेची शैली झटका एक आस या चित्रपटाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला अनुभवता येणार आहे. पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला अभिमान आणि हेवा वाटेल की माण खटाव सारख्या दुष्काळी भागातही चित्रपटचे चित्रीकरण होऊ शकतं ही बाब नक्कीच माण खटावसाठी प्रेरणादायी आणि कैतुकास्पदय आहे.
विशेष म्हणजे माण-खटावमधील खेड्यातील मुलामुलींना या चित्रपटामध्ये अभिनय करण्याची संधी देण्यात आली आहे.





झटका एक आस.. या चित्रपटाचे चित्रीकरण शुभारंभ प्रसिध्द निर्माते महेश देशपांडे यांच्या उपस्थितीत झाला आहे. यावेळी मराठी चित्रपट सृष्टीतले अनेक दिग्गज,नावारूपाला येत असलेले उदयोन्मुख कलाकार आणि फिल्ममेकर उपस्थित राहिले होते.
मयुरी रणदिवे फिल्म प्रोड्युकॅशन प्रस्तुत ‘झटका एक आस’ या चित्रपटाचे दिग्दर्शक-रवींद्र दहातोंडे, निर्माता- सुनिता रणदिवे,भूषण माळी, विकास बोटे,कार्यकारी निर्माता – मेहबूब मुल्ला,सहायक दिग्दर्शक- आकाश रायचंद शिंदे,सुशील अवघडे, श्रध्दा गायकवाड, डिओपी प्रिन्स प्रोडक्शन अमरावतीचे अनुप गजानन वाकोडे,संगीत दिग्दर्शक राहुल नामदास, हमीद नदाफ रंगभूषा- रणजित सूर्यवंशी, छायाचित्रणकार- पंकज काशिद, वेशभूषा व्यवस्थापक अजय नलवडे,सागर बुधावले, आदी दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
-सहाय्यक दिग्दर्शक-आकाश रायचंद शिंदे